Tuesday, March 17, 2020

कोरोना कोणत्याच प्रकारचे औषध उपलब्ध नाही तरीपण लोक कसे काय आजारातून बरे होतात..??

कोरोना कोणत्याच प्रकारचे औषध उपलब्ध नाही तरीपण लोक कसे काय आजारातून बरे होतात..??

जगभरात धुमाकुळ घातलेल्या कोरेणा आजारवर आतापर्यंत कोणत्याही प्रकारचा औषध अजून पर्यंत वैज्ञानिकांना तयार करण्यात यश आलेले नाही. तरीपण चीनमध्ये किंवा इतर देशांमध्ये कोरेना बाधित लोक हळूहळू बरे होत आहेत.
हे कसं काय शक्य झालं.?

याच उत्तर आहे आपल्या  मधे असणारी प्रतिकार शक्ती. प्रतिकारशक्ती मध्ये असणाऱ्या W.B.C (white blood cell / पांढऱ्या पेशी) . या सतत आपल्या आपल्या शरीरावर होणाऱ्या सूक्ष्मजीवांच्या हल्ल्यापासून आपलं संरक्षण करत असतात, म्हणजेच या पेशी आपल्या शरीरातील सैनिक पेशी म्हणून कार्य करत असतात.
एखादा व्हायरस , बॅक्टेरिया , किंवा कोणत्याही प्रकारचा सूक्ष्मजीव आपल्या शरीरात येताक्षणी त्या पेशी यांना त्यांच्या शरीरावर असणार्‍या विशिष्ट प्रकारच्या प्रथिनांमुळे
 ( Antigen)  त्यांना ओळखतात, व प्रतिजैविके
 (Antibody) तयार करतात ही प्रतिजैविके त्या सूक्ष्मजीवांना मारून टाकतात.
 अशाप्रकारे आपण आजारापासून व सूक्ष्म जिवांच्या हल्ल्यापासून बरे होतो.



अशाच प्रकारे आपले शरीर कोरेना व्हायरस पासून आपला बचाव करू शकते, त्यासाठी आपली रोग प्रतिकार शक्ती मजबूत असणे गरजेचे आहे.

या मुळेच आत्ता पर्यंत जे लोक कोरेना बाधित होते ते बरे झाले.

कोरोना हा व्हायरस झूनोसेस ( म्हणजेच प्राण्यापासून होणारा आजार.) असल्यामुळे आपल्या शरीरातील रोग प्रतिकार शक्तीला लवकर ओळखता येत नाही, त्यामुळे आपल्या शरीरात त्या व्हायरस ला मारण्यासाठी प्रतिजैविके तयार होत नाहीत, किंवा प्रतिजैविके तयार होण्यासाठी वेळ लागतो.

 जर आपली प्रतिकारशक्ती चांगली असेल तर आपली प्रतिकारशक्ती ह्या विषाणू वरील प्रथिनांना ओळखून त्यांना मारण्यासाठी प्रतिजैविके तयार करतील व कोरेना व्हायरसला  मारून टाकतील.

 यावरून असे लक्षात येते  की कोरेणा पासून बचाव करायचा असेल तर आपली रोगप्रतिकारशक्ती सुधारली पाहिजे._

त्यासाठी पोषणयुक्त आहार,(  फळे, हिरव्या भाज्या , व्यवस्थित शिजवलेले अन्न)
वेळेवर झोप,
व्यायाम,
इत्यादी गरजेचे आहे.

रोग प्रतिकारशक्ती वाढवा कोरेना पासून बचाव करा..






No comments:

Post a Comment

भारतीय जनता युवा मोर्चा आंदोलन

भारतीय जनता युवा मोर्चा. बेमुदत आमरण उपोषण कर्ते @Rau_Sudarshan यांची भेट.. pic.twitter.com/fZ8nI6aN1S — RAhul awatade (@RAhulawatade1) Apr...