भारतीय जनता युवा मोर्चा.
— RAhul awatade (@RAhulawatade1) April 1, 2022
बेमुदत आमरण उपोषण कर्ते @Rau_Sudarshan यांची भेट.. pic.twitter.com/fZ8nI6aN1S
RAhul Awatade Personal Blog
Well Come to the My blog .. keep visiting for know about me.......
Friday, April 1, 2022
भारतीय जनता युवा मोर्चा आंदोलन
Saturday, January 29, 2022
Tuesday, March 17, 2020
कोरोना कोणत्याच प्रकारचे औषध उपलब्ध नाही तरीपण लोक कसे काय आजारातून बरे होतात..??

जगभरात धुमाकुळ घातलेल्या कोरेणा आजारवर आतापर्यंत कोणत्याही प्रकारचा औषध अजून पर्यंत वैज्ञानिकांना तयार करण्यात यश आलेले नाही. तरीपण चीनमध्ये किंवा इतर देशांमध्ये कोरेना बाधित लोक हळूहळू बरे होत आहेत.
हे कसं काय शक्य झालं.?
याच उत्तर आहे आपल्या मधे असणारी प्रतिकार शक्ती. प्रतिकारशक्ती मध्ये असणाऱ्या W.B.C (white blood cell / पांढऱ्या पेशी) . या सतत आपल्या आपल्या शरीरावर होणाऱ्या सूक्ष्मजीवांच्या हल्ल्यापासून आपलं संरक्षण करत असतात, म्हणजेच या पेशी आपल्या शरीरातील सैनिक पेशी म्हणून कार्य करत असतात.
एखादा व्हायरस , बॅक्टेरिया , किंवा कोणत्याही प्रकारचा सूक्ष्मजीव आपल्या शरीरात येताक्षणी त्या पेशी यांना त्यांच्या शरीरावर असणार्या विशिष्ट प्रकारच्या प्रथिनांमुळे
( Antigen) त्यांना ओळखतात, व प्रतिजैविके
(Antibody) तयार करतात ही प्रतिजैविके त्या सूक्ष्मजीवांना मारून टाकतात.
अशाप्रकारे आपण आजारापासून व सूक्ष्म जिवांच्या हल्ल्यापासून बरे होतो.
अशाच प्रकारे आपले शरीर कोरेना व्हायरस पासून आपला बचाव करू शकते, त्यासाठी आपली रोग प्रतिकार शक्ती मजबूत असणे गरजेचे आहे.
या मुळेच आत्ता पर्यंत जे लोक कोरेना बाधित होते ते बरे झाले.
कोरोना हा व्हायरस झूनोसेस ( म्हणजेच प्राण्यापासून होणारा आजार.) असल्यामुळे आपल्या शरीरातील रोग प्रतिकार शक्तीला लवकर ओळखता येत नाही, त्यामुळे आपल्या शरीरात त्या व्हायरस ला मारण्यासाठी प्रतिजैविके तयार होत नाहीत, किंवा प्रतिजैविके तयार होण्यासाठी वेळ लागतो.
जर आपली प्रतिकारशक्ती चांगली असेल तर आपली प्रतिकारशक्ती ह्या विषाणू वरील प्रथिनांना ओळखून त्यांना मारण्यासाठी प्रतिजैविके तयार करतील व कोरेना व्हायरसला मारून टाकतील.
यावरून असे लक्षात येते की कोरेणा पासून बचाव करायचा असेल तर आपली रोगप्रतिकारशक्ती सुधारली पाहिजे._
त्यासाठी पोषणयुक्त आहार,( फळे, हिरव्या भाज्या , व्यवस्थित शिजवलेले अन्न)
वेळेवर झोप,
व्यायाम,
इत्यादी गरजेचे आहे.
रोग प्रतिकारशक्ती वाढवा कोरेना पासून बचाव करा..

Wednesday, January 22, 2020
Monday, May 20, 2019
पशुपक्षांकडून मिळणारे पावसाचे पूर्वसंकेत..

(Bio-indicator)
1. चातक पक्षी -
पावसाळा जवळ आल्याचे संकेत आफ्रिकेतून आलेले चातक पक्षी सर्वप्रथम देतात. पाऊस अगदी वेळेवर येणार असेल तर चातक पक्ष्यांचे आगमन लवकर होते. जर त्यांचे आगमन लांबले तर पाऊसही लांबणार, ही काळ्या दगडावरची रेघ. त्यासाठी कोणत्याही भविष्यवेत्त्याची गरज नाही. चातक पक्षी ‘पिऊ.. पिऊ’ या त्यांच्या सांकेतिक आवाजात ओरडू लागले की पहिल्या पावसाचे दिवस जवळ आले हे हमखास समजावे.
2. पावशा पक्षी -
चातक पक्ष्याप्रमाणेच सृष्टीतील बदलांचे पूर्वसंकेत देणाऱ्या आश्चर्यकारक घटनांचा पावशा पक्षी हा आणखी एक महत्त्वाचा दूत! ‘पेर्ते व्हा’ असे सांगणारा पावशा ओरडू लागला की जुन्या काळी शेतकरी मशागतीची कामे सुरू करत.
3. तित्तीर पक्षी -
माळरानावर, शेतांवर काळ्या-पांढऱ्या, अंगावर ठिपके असलेल्या तित्तीर पक्ष्यांचे थवे ‘कोडय़ान केको.. कोडय़ान केको..’ अशा सांकेतिक स्वरात ओरडू लागले की आता लवकरच पाऊस येणार असे खुशाल समजावे. जंगलातील माळरानांत या पक्ष्यांचे अस्तित्व फारसे आढळून येत नाही. परंतु मानवी वस्त्यांशेजारच्या माळरानांवर तित्तीरांचा गडबडगुंडा सुरू झाला की ते हमखास पावसाचे लक्षण समजले जाते.
4. कावळा -
कावळ्याने मे महिन्याच्या काळात बाभुळ, सावर अशा काटेरी झाडांवर घरटे केले तर पाऊस कमी पडतो आणि आंबा, करंज या वृक्षांवर केले तर त्या वर्षी पाऊस चांगला येतो, हा जंगलातला अनुभव आहे. कावळ्याने झाडाच्या पूर्व दिशेने घरटे केले तर पाऊस चांगला पडणार. पश्चिमेला केले तर पाऊस सरासरीएवढा पडणार. दक्षिण-उत्तरेला केले तर पाऊस अत्यंत कमी पडणार. आणि झाडाच्या शिखरावर केले तर अवर्षणपर्वाची ती नांदी होय. सहसा कावळा झाडाच्या शिखरावर घरटे करीत नाही. आणि केले तर ती अत्यंत दुर्मीळ घटना असते. यातून दुष्काळाचे अगदी डोळस संकेत मिळू शकतात.
यापेक्षाही मनोरंजक बाब म्हणजे कावळिणीने अंडी किती घातली, यावरूनही जुन्या काळात पावसाचा अंदाज बांधला जात असे. तिने सुमारे चार अंडी दिली तर पाऊस चांगला पडतो. दोन अंडी दिली तर कमी पाऊस. एकच अंडे दिले तर अतिशय कमी. आणि जमिनीवर अंडी दिली तर अभूतपूर्व दुष्काळाचे आगमन ठरलेले.
5. वादळी पक्षी -
पाऊस येण्याअगोदर वादळी पक्षी किनाऱ्याच्या दिशेने येऊ लागतात. त्यामुळे पाऊस पडणार याचे संकेत ओळखून समुद्रावर उपजीविका करणारे मच्छिमार आपल्या बोटी, जहाजे, पडाव समुद्रात नेत नाहीत. अशावेळी केव्हाही पाऊस कोसळण्याची शक्यता असते. वादळी पाखरू किनाऱ्याच्या दिशेने आले की वादळवारा त्याच्यापाठोपाठ येत आहे याचे संकेत कोळ्यांना मिळतात. एक प्रकारे ती धोक्याची पूर्वसूचनाच असते. त्याचा अर्थ हमखास पाऊस पडणार किंवा सुमद्रात वादळ येणार.
6. मासे -
पहाडी, डोंगरी भागातील माशांच्या अंडय़ांतील पिल्ले मोठी होऊन जेव्हा समुद्राच्या दिशेने पोहू लागतात, तेव्हा तो काळ पाऊस संपण्याचा… उत्तरा नक्षत्राचा असतो. त्यामुळे पाऊस केव्हा पडणार आणि केव्हा संपणार, याची सुस्पष्ट चाहूल माशांच्या या जीवनचक्रातून मिळते.
7. खेकडे -
तांबूस रंगाचे खेकडे हजारोंच्या संख्येने समुद्राच्या दिशेने जाताना दिसतात. तुम्ही त्यांच्या मार्गाचे निरीक्षण केले असता अशा अनेक अभूतपूर्व घटना पाहावयास मिळतात. समुद्राच्या दिशेने जाणाऱ्या खेकडय़ांवरून शेतकऱ्याला पावसाचे संकेत मिळतात. हा खेकडय़ांच्या स्थलांतरणाचा कालखंड आहे. भरधाव वाहनांखाली असे हजारो खेकडे दरवर्षी समुद्राकडील प्रवासादरम्यान चिरडले जातात. परंतु त्यांची समुद्री धाव कशासाठी असते, याचा कोणी विचारही करीत नाही.
8. हरीण -
पाऊस येणार नसेल तर विणीच्या काळातही हरिणी पिल्लांना जन्म देत नाहीत.
9. वाघिण -
आम्ही पाहिलेली ही वाघीण गर्भवती होती. तिला पिल्ले होणार होती. परंतु या वाघिणीने डायसकोरियाचे कंद खाऊन गर्भपात करवून घेतला. हे कंद खाऊन आदिवासी स्त्रियादेखील गर्भपात करवून घेतात. या वाघिणीचे सृष्टीज्ञान अक्षरश: तोंडात बोटे घालायला लावणारे होते. यंदा पाऊस येणार नाही, त्यामुळे जंगलात गवत राहणार नाही. गवत नाही म्हणजे तृणभक्षी प्राणीदेखील राहणार नाहीत. परिणामी आपल्या पिलांना भक्ष्य मिळणार नाही. त्यांची उपासमार होईल… याची पूर्वकल्पना आल्यानेच तिने गर्भपात करवून घेतला होता. वाघिणीच्या गर्भपातानंतर त्या वर्षी अभूतपूर्व दुष्काळ पडल्याचा अनुभव आम्ही घेतला आहे.
10. वाळवी -
जंगलात हमखास झाडे पोखरणाऱ्या वाळवी/ उधईला कधी पंख फुटत नाहीत. परंतु पावसाळ्यापूर्वी वारुळातून उधईचे थवेच्या थवे हजारोंच्या संख्येने एका झपाटय़ात बाहेर पडू लागले की पावसाचे लवकर आगमन होते. पावसाळ्यापूर्वी प्रजननासाठी वाळवीचे पंख फुटलेले थवे उडून एकमेकांशी समागम करतात. त्यातून त्यांच्या नंतरच्या पिढय़ा तयार होतात. त्या जंगलात वारुळे तयार करतात.
11. काळ्या मुंग्यां -
हजारोंच्या संख्येने काळ्या मुंग्या त्यांची पांढरी अंडी तोंडात धरून सुरक्षित जागी नेऊ लागल्यास पाऊस नक्की पडणार, हे समजावे. अत्यंत पुरातन काळापासून काळ्या मुंग्यांच्या हालचालींवरून पावसाचे अंदाज बांधले जात आहेत.
बिळांमध्ये दडून राहणारे सरपटणारे जीव बिळाच्या बाहेर पडू लागले की ती हमखास पावसाची चाहूल समजावी. या प्राण्यांना पाऊस येणार असल्याचे अगोदरच कळलेले असते. त्यामुळे बिळात पाणी शिरण्यापूर्वीच स्वत:च्या बचावासाठी ते उंच जागांचा आश्रय शोधू लागतात. पावसाळ्यापूर्वी सापदेखील मोठय़ा प्रमाणात बिळाच्या बाहेर पडू लागतात.
*मराठवाडय़ा प्रचंड संख्येने आढळणाऱ्या गोडंबा- म्हणजे बिब्याच्या झाडाला बहर येणे हे दुष्काळाचे संकेत आहेत.
*खै आणि शमीच्या वृक्षांना फुलोरा आल्यास त्या वर्षी पाऊस कमी पडतो.
*कवठाला आलेला फुलांचा बहर वादळवाऱ्याचे संकेत देतो.*
*बिचुलचा बहर आणि कुटजाचा बहर तर अतिवृष्टीचेच हाकारे देतो.*
*आपण वेली पाहतो. या वेलींचे तंतू अगदी काटकोनात, सरळ रेषेत उभे राहताना दिसू लागले तर ते चांगल्या पावसाचे लक्षण समजावे.*
( via Whatsapp )

Subscribe to:
Comments (Atom)
भारतीय जनता युवा मोर्चा आंदोलन
भारतीय जनता युवा मोर्चा. बेमुदत आमरण उपोषण कर्ते @Rau_Sudarshan यांची भेट.. pic.twitter.com/fZ8nI6aN1S — RAhul awatade (@RAhulawatade1) Apr...
-
Holi is a Hindu spring festival celebrated in the Indian subcontinent , also known as the "festival of colours". It signifi...
-
World Book Day or World Book and Copyright Day (also known as International Day of the Book or World Book Days ) is a yearly event o...
-
Sparrows are amongst the bird species that we have been seeing since childhood. But, recent surveys have shown that their numbers are decl...
-
Earth Day text messages and quotes which can be used for sending best wishes to one and all. 1) “Earth is like our home and it belongs t...